Showing posts with label भूकंप. Show all posts
Showing posts with label भूकंप. Show all posts

भूकंप

एके दिवशी भूकंपाविषयी बातम्या पहाव्यात म्हणून टीव्ही समोर सोफ्यावर येऊन बसलो...... प्राइम टाइम चालू असावा......... बाजूलाच आमची म्हाळसा त्या म्हाळसेच्या दू:खात बुडालेली होती, रिमोट मागावा तर इथेच भूकंप व्हायचा, त्यापेक्षा उद्या पेपरातच बातम्या वाचाव्यात असा विचार करून उठत होतो तितक्यात मुलगा तिथे आला आणि शोधाशोध करू लागला, मी विचारले " काय शोधतोस?
काही हरवले का?"
" काही नाही हरवले हो, रिमोट शोधतोय मुंबईची मॅच चालू आहे स्कोअर पहायचाय,  कुठे आहे?"

मी बायकोकडे बोट दाखवले.
मुलगा :- " तुमचा नाही हो, टीव्हीचा पाहिजे!"