भयंकर उकाडा, लोकलची गर्दी. घरात शिरलो. सोफ्यावर अंग टाकले. सौ. ने पाण्याचा पेला दिला. हूश्श करेस्तोवर लेकाने प्रशस्तीपत्रक पुठे केले. मराठी ३८, इंग्रजी ३५, गणित ४० पुठचे काही वाचण्या पुर्वीच मी खेकसलो, मन्या ! काय मार्क हे, गाढवा, लाज वाटते का काही, दगड आहेस नुसता दगड...
अहो पण जरा ऐकता का ?
तू गप्प बैस ! तूझ्या लाडानेच फुकट गेला आहे तो. नालायका, अरे बाप राब राब राबतो आहे आणी तूम्ही असे गुण उधळा.
मुलगा गप्प. मान खाली.
अहो !
तू गप्प रहा, एक शब्द बोलू नकोस. आज याला दाखवतोच...
अहो! सौ. चा आवाज चढला. मी थोडा वरमलो.
ऐकून तर घ्या ना जरा !
सकाळी माळा साफ करताना सापडलेली तूमचीच मार्कशीट आहे ती...
भयाण शांतता...
No comments:
Post a Comment